ठेव योजना

गुंतवणुकदारांनी अधिक सकारात्मक दृष्टया तसेच भावनिकतेने गुंतवणूक करण्यासाठी म्हणून अशाप्रकारची अधिष्ठानप्राप्त नावे ठेव योजनांना देण्यात आली आहेत, संस्थेकडे गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याजदराच्या विविध ठेव योजना सुरु असून ठेवीदारांनी संस्थेच्या आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन हे करत आहे. सर्व योजनांसाठी के.वाय.सी. नॉर्म्स पूर्ण करणे आवश्यक.


धनश्री ठेव योजना

कमी कालावधीसाठी रक्कम ठेवू इच्छिणाऱ्या खातेदारांसाठीही उपयुक्त ठेव योजना आहे. ३० दिवसांपासून ३६४ दिवसांपर्यंत यामध्ये रक्कम गुंतवता येते व बचत ठेवीपेक्षा जास्त व्याजदर मिळवता येतो. जेवढे दिवसांकरीता आपल्याला रक्कम गुंतवणूक करता येते तेवढे दिवस रक्कम गुंतवून त्यामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी ही उपयुक्त योजना आहे. मुदतपूर्व रक्कम काढणेची सोयही आहे. रक्कम ज्या कालावधीसाठी ठेवली आहे त्यानंतरही रक्कम न काढल्यास त्या कालावधीसाठी ऑटो रिन्युअलची सुविधाही उपलब्ध आहे. आपल्या गरजेप्रमाणे कमी कालावधीसाठी रक्कम ठेऊन उत्पन्न मिळवणेसाठी या योजनेत गुंतवणूक करावी.


जनश्रद्धा ठेव योजना

कमी कालावधीची असणारी अशी ही ठेव योजना असुन त्यामुळे रक्कम आहे तशीच न ठेवता गुंतवणुकदारांना कमी मुदतीत अधिक व्याजदराचा लाभ घेता येतो. ३ ते ६ महिन्यांकरिता रक्कम गुंतवणुकीसाठी ही योजना सुरु आहे. या ठेव योजनेतुन संस्थेतील इतर ठेव योजनांनमध्ये नूतनीकरण करता येते.


स्वरुपांजली ठेव योजना

१२ ते १८ महिन्यांची असणारी हि योजना सलग ७ ते ८ वर्षे नुतनीकरण केल्यास रक्कम दामदुप्पट होऊ शकते.ही संस्थेची सर्वात लोकप्रिय ठेव योजना असून गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सदर योजनेत गुंतवली जाणारी रक्कम ही त्वरीत कर्जफ़ेड होणा-या योजनेमार्फत वितरीत केली जाते.


सोहम ठेव योजना

निवृत्तीधारक व महीला ठेवीदारांमध्ये ही योजना लोकप्रिय असून या योजनेमध्ये रक्कम ३६ ते ६०महिन्यांकरीता गुंतवून मासिक/त्रैमासिक व्याज मिळण्याची सोय या योजनेंतर्गत उपलब्ध आहे, यासाठी संस्थेमध्ये बचत खाते असणे अनिवार्य राहिल. या योजनेमध्ये मिळणारे मासिक/त्रैमासिक व्याज बचत खात्यामध्ये जमा होते.


श्रीस्वरूप ठेव व स्वानंद ठेव योजना

१३ महिने ते १६ महिने मुदतीच्या या ठेव योजना असून संस्था वेळोवेळी या योजनांकरिता आकर्षक व्याजदर जाहीर करीत असते. यामुळे रक्कम आहे तशीच न ठेवता गुंतवणुकदारांना कमी मुदतीत अधिक व्याजदराचा लाभ घेता येतो. सदर योजनेत गुंतवली जणारी रक्कम ही त्वरीत कर्जफ़ेड होणा-या योजनेमार्फत वितरीत केली जाते. सदर योजनेत गुंतवणुकदारास मुदतपुर्व रक्कम काढावयाची असल्यास अडचण येत नाही.


आवर्त ठेव योजना

ही योजना एक वर्ष मुदतीची असून दरमहा एक ठराविक रक्कम या योजनेमध्ये गुंतविल्यावर वर्षभरानंतर व्याजासह रक्कम ठेवीदारास मिळते. सदर योजनेसाठी संस्थेने अधिकृत एजंट नेमले आहेत, त्यामुळे गुंतवणुकदारांना घरबसल्या या योजनेचा लाभ घेता येतो.


पिग्मी ठेव योजना

संस्थेची व्यापारी वर्गामधील सर्वात लोकप्रिय अशी ही पिग्मी ठेव योजना असून संस्था शहरात संस्थेच्या २२ एजंटाद्वारे दररोज लोकांशी संपर्क करून खातेदारांमार्फत दररोज या योजनेत रु.४ लाख ६३ हजार(अंदाजे) जमा करते. या योजनेमध्ये किमान रु.१०/- भरून खातेदार खाते सुरु करू शकतो व दररोज ती रक्कम एजंटमार्फत जमा करू शकतो.


ऑटो रिन्युअल सुविधा

संस्थेच्या वरील सर्वठेव योजनांमध्ये ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर ऑटो रिन्युअल सुविधा मिळते व त्याच तारखेने त्याच योजनेत रक्कम परत गुंतवली जाते यामुळे मुदत पुढे वाढवू इच्छीणाऱ्याठेवीदारांची चांगली सोय झाली आहे.


आमचे पिग्मी एजंट..

अ.क्र.पिग्मी एजंटशाखेचे नाव
1 सुहास महादेव संसारेकुवारबाव शाखा
2 समिता संजय खेडेकर
3 राजेश रामचंद्र गोताडखंडाळा शाखा
4 मोहन गणपत बलेकर
5 प्रशांत प्रकाश सावंतजाकादेवी शाखा
6 सीमा श्रीकृष्ण लंगोटेदेवगड शाखा
7 दिपाली दिलीप कानडेदेवरुख शाखा
8 ऋषिकेश विनायक ठाकूरनाटे शाखा
9 शिल्पा काशिनाथ शिंदेपुणे शाखा
10 विजय पांडुरंग पालकरपाली शाखा
11 शशिकांत महादेव आग्रेपावस शाखा
12 शृती संजय शेट्येमारुती मंदिर शाखा
13 संतोष आत्माराम रामाणीमालगुंड शाखा
14 कौस्तुभ अशोक गानूरत्नागिरी शाखा
15 शिल्पा अरविंद कोळवणकर
16 संजय अनंत नाईक
17 रणजीत रमेश देसाई
18 वेदश्री विरेंद्र पंडित
19 प्रविण वसंत मादुस्कर
20 संतोष मधुकर जुवळेराजापूर शाखा
21 पूजा संजय बेनकरलांजा शाखा
22 नितीन सुरेश केळकरसाखरपा शाखा

ठेव योजना व्याजदर

ठेव प्रकारकालावधीसर्वसाधारण व्याजदरजेष्ठ नागरिक/महिला व्याजदर
धनश्री ठेव३० दिवस ते ९० दिवस४.००%४.००%
धनश्री ठेव९१ दिवस ते १८० दिवस५.००%५.००%
धनश्री ठेव१८१ दिवस ते ३६४ दिवस५.५०%५.५०%
सोहम ठेव१९ ते ६० महिने (मासिक व्याज)६.७५%७.००%
सोहम ठेव१९ ते ६० महिने (पूनर्गुंतवणूक व्याज)६.००%६.२५%
स्वरुपांजली ठेव१२ महिने ते १८ महिने६.५०%६.७५%
Last Updated On 06 Oct 2022