सूचना फलक..!


स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्हा

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांकरिता)


स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या सभासदांची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.१८/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता शासनाचे परीपत्रकाप्रमाणे व्हिडीओ काùन्फरन्स द्वारे घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर Zoom app डाऊनलोड करावे. त्याचा मिटींग आय.डी २८७९२५९८०० असा असून पासवर्ड agm@१२३ असा आहे. सदर सभेमध्ये पुढील विषयांचा विचार करण्यात येणार आहे. कृपया सभेला सर्व सभासदांनी वेळेवर लाùग इन करून उपस्थित रहावे, ही विनंती.


१) दि.२७/०९/२०२० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.

२) दि.०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२१ या वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे.(पत्रके संस्थेच्या सूचनाफलकावर लावलेली आहेत व वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहेत.)

३) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५(२) मधील तरतुदींना अधिन राहून संस्थेने व्यवस्थापक समिती सदस्यांना व त्यांचे कुटुंबियाना दिलेली कर्जे व वसूली पत्रकांची नोंद घेणे.

४) नफा वाटणी करणे व भागधारकांना लाभांश देणेबाबत विचार करणे.

५) सन २०२१-२०२२ साठीचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे.

६) सन २०२०-२०२१ या वर्षाच्या वैधानिक लेखा परीक्षणाच्या अहवालाची नोंद घेणे.

७) मागील वर्षाच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.

८) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे.

९) प्रशिक्षण/कर्ज/गुंतवणूक/वसुली/कार्यविस्तार इ. तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे.

१०) कोव्हीड १९ कर्जहप्तेवाढ योजनेचे धोरणास मान्यता देणेबाबत.

११) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांसंबंधी विचार करणे.


दि.०१/०९/२०२१ व्यवस्थापक मंडळाच्या अनुज्ञेने

व्यवस्थापक : श्री.मोहन हरी बापट

टीप ः

१) ज्या सभासदांना सभपुढे विषय/ठराव मांडावयाचे असतील त्यांनी सूचक/ अनुमोदक यांचे नावासह कार्यालयात दिनांक ०९/०९/२०२१ पर्यंत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा/सूचनांचा विचार करणे शक्य होणार नाही.

२) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास सभेचे काम अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच लिंकवर सुरु होईल. त्यास गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.

३) संस्थेची आर्थिक पत्रके संस्थेचे सुचनाफलकावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. तसेच संस्थेचे वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहेत.