करोना काळातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सहा कोटींचा नफा

करोनाच्या उद्रेकामुळे गेली सुमारे दोन वर्षे व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात मंदी असतानाही कोकण विभागातील अग्रगण्य स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने ६ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, या काळात संस्थेच्या ठेवींनी २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

जागतिक पातळीवर कठीण ठरलेले २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कामगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी परिषदेपुढे मांडली. भोवतालची आर्थिक परिस्थिती वाईट असूनही पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सर्वांगीण वाढ नोंदवली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी २५० कोटी ३१ लाख रुपये, तर १७० कोटी ५१ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले असून ११९ कोटी ६९ लाख रुपये गुंतवणूक झाली आहे. तसेच संस्थेचा स्वनिधी ३१ कोटी ८५ लाख रुपये आणि ३ कोटी ५५ लाख रुपयांच्या मालमत्ता झाल्या आहेत. मंदीचे वातावरण असूनही संस्थेने कर्जदारांकडून ९९.५१ इतकी विक्रमी वसुली झाली आहे. संस्थेच्या सर्व, १७ शाखा नफ्यात असून चालू वर्षी ६ कोटी २१ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये २४ कोटी रुपयांनी वाढ झाली. यामध्ये संस्थेच्या १७शाखांपैकी ८ शाखांमधून ठेवींमधील वाढ १ कोटीपेक्षा अधिक आहे, अशी माहिती पटवर्धन यांनी दिली. समाजाप्रती दायित्व ओळखून संस्थेने करोना कालावधीत सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कार्यावर १३ लाख ७१ हजार रुपये खर्च केले आहेत