भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांचा वाढदिवस साजरा

भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने भाजप कार्यालय रत्नागिरीमध्ये साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती. या वेळी भाजपचे सचिन करमरकर, संदीपसुर्वे, विजय सालीम, सुशांत चवंडे, राजू तोडणकर, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, विक्रम जैन, प्रवीण देसाई, नीलेश आखाडे, राजन फाळके, प्रसाद दामले, प्रसाद बाष्टे, नितीन जाधव, मानसी करमरकर, प्रवीण रायकर, वर्षा ढेकणे, सुपिया रसाळ, प्रणाली रायकर, मनोर दळी, राजू कीर उपस्थित होते