स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा सोमवारी नव्या स्ववास्तूत स्थलांतरित झाली. मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पावस दशक्रोशीतील सुमारे पाचशे ग्राहकांनी शाखेला भेट देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि संचालक, कर्मचाऱ्यांनां शुभेच्छा दिल्या.
शाखेच्या नूतन वास्तूचे फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन अॅड. पटवर्धन यांनी केले. याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, गोळपच्या सरपंच सौ. मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई, संचालक अजित रानडे, जयप्रकाश पाखरे, शरदचंद्र लेले, प्रसाद जोशी, राजू सावंत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन करतानां सांगितले की, पावस दशक्रोशीत पतसंस्थेचे ९ हजार ग्राहक असून २१ कोटी ८८ लाखांची कर्जे दिली आहेत. ही कर्जवसुली १०० टक्के आहे. नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद होतोय. आपले आचरण, विचार चांगले असतील तर स्वामी स्वरूपानंदांसारख्या थोर विभूतींचा आशीर्वाद मिळतो. हा आशीर्वाद स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला लाभला आहे. स्वामींच्या
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या पावस शाखेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उद्घाटन फित कापून करताना
पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन आणि मान्यवर. कृपाशीर्वादामुळे पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे, असे विचार व्यक्त केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी जयंत फडके यांनी पावस दशक्रोशीत आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम यांवर प्रक्रिया उद्योग सुरू होण्याकरिता पतसंस्थेने मदत करण्याचे आवाहन केले. रमण दळी, लाईक फोंडू, विश्वास दामले, अक्रम नाखवा, इंटेरियर डिझायनर प्रशांत माचकर, गणेशगुळे
सरपंच श्रावणी रांगणकर, करिम सावकार, हनिफ मुल्ला, फकीर पांढरे, मजिद काझी, इम्रान हाजू, जुनेद फोंडू, नाना पावसकर, प्रशांत फडके, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे, रणजित सुर्वे, अमोल पाथरे, पावसचे उपसरपंच प्रवीण उर्फ बाय शिंदे, विजय देसाई, विक्रांत रांगणकर, मनोहर लेले, कांचनकुमार काळे, रघुनाथसिंह चुंडावत, मंगेश भोजने, अरविंद पवार, प्रकाश पवार,
समीर हातोडकर, बाबाशेठ साळवी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनेकांनी आपले विचार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व्यवस्थापक मोहन बापटयांनीकेले. यावेळीउपव्यवस्थापक हेमंत रेडीज, पावस शांखा व्यवस्थापक विशाल सावंत व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे स्वागत केले.
