स्वामी स्वरूपानंद संस्थेतर्फे सीईओ गुरव यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी *अधिकारी सुनील गुरव यांचा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला. निवृत्तीनिमित्त हा छोटेखानी कार्यक्रम स्वरूपानंद पतसंस्थेत करण्यात ओला. तसेच, या वेळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांचेही स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बँकेचे मुख्य कार्यकारी गुरव निवृत्त झाले. निरोप समारंभाच्यावेळी त्यांनी वेळोवेळी संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केला. या प्रसंगी बँकेचे नवनियुक्त सीईओ अजय चव्हाण यांना पुढील वाटचालीमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्था साथ देईल व त्यांच्या नेतृत्त्वात सहकार क्षेत्रात बँक मोठी प्रगती करेल, अशा शुभेच्छा अॅड. पटवर्धन यांनी दिल्या. या वेळी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक मोहन बापट व उपव्यवस्थापक हेमंत रेडीज व कर्मचारी उपस्थित होते.