महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेने कोरोना काळात केलेल्या वसुलीबाबत ॲड. दीपक पटवर्धन यांचे कौतुक केले.
काकासाहेब कोयटे यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ व स्वामी स्वरुपानंदांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. दीपक पटवर्धन यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सादर केला.
- ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडून आर्थिक लेखाजोखा सादर.
- कोरोना काळात केलेल्या कामाबाबत पतसंस्थेचे कौतुक.
- काकासाहेब कोयटे यांची पतसंस्थेला सदिच्छा भेट.
संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना कालखंडातही संस्थेच्या उत्तम वसुलीबाबत दीपक पटवर्धन यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक शरदचंद्र लेले व उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते.
