जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुरव यांचा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे निरोप समारंभ व नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेत ३७ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेले सुनील गुरव व त्यांच्या जागी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांना पतसंस्थेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते झाला. यावेळी संथेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
