स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून मंगळवार दिनांक ९ मे रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या सभेमध्ये अॅड. दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, सौ. बापट, सौ. गोगटे, संतोष प्रभू, शरदचंद्र लेले, प्रदीप कुळकर्णी आदी नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे यांनी घोषित केले.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. दीपक पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेचे माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला.
स्वरूपानंद पतसंस्थेच्या सर्व ४३ हजार सभासदांनी आपल्याला परत एक संधी दिल्याबद्दल अॅड. दीपक. पटवर्धन यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले असून माझ्यावर दर्शवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक द्रुतगतीने वाढवण्यासाठी संचालकांच्या साथीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. आणि उपाध्यक्ष माधव गोगटे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
