‘स्वामी स्वरूपानंद’ अध्यक्षपदी पुन्हा पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. मंगळवारी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन, तर उपाध्यक्षपदी माधव गोगटे यांची बिनविरोध निवड झाली.

जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, बापट, गोगटे, संतोष प्रभू, शरदचंद्र लेले, प्रदीप कुलकर्णी या नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकमुखाने अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड केली. तशी घोषणा निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे यांनी केली.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती : सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले अॅड. पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेचे माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या सर्व ४३ हजार सभासदांनी आपल्याला परत एक संधी दिल्याबद्दल अॅड. पटवर्धन यांनी धन्यवाद दिले असून माझ्यावर दर्शवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक द्रुतगतीने वाढवण्यासाठी संचालकांच्या साथीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.