‘स्वामी स्वरूपानंद’च्या पावस स्ववास्तूचे उद्घाटन

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा सोमवारी (१५ मे) नव्या स्ववास्तूत स्थलांतरित झाली. फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून ॲड. पटवर्धन यांनी उद्घाटन केले. सोहळ्यात पावस दशक्रोशीतील सुमारे ५०० ग्राहकांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपाध्यक्ष माधव गोगटे, व्यवस्थापक मोहन बापट गोळपच्या सरपंच मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई, पतसंस्थेचे संचालक अजित रानडे, जयप्रकाश पाखरे, शरदचंद्र लेले, प्रसाद जोशी, राजू सावंत उपस्थित होते. ॲड. पटवर्धन पुढे म्हणाले की, पांवस दशक्रोशीत पतसंस्थेचे ९ हजार ग्राहक असून, २१ कोटी ८८ लाखांची कर्जे दिली आहेत. ही कर्जवसुली १०० टक्के आहे. नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद होतोय. या पंचक्रोशीतील विकासचक्र अधिक गतिमान करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.

या वेळी प्रगतशील शेतकरी जयंत फडके यांनी पावस दशक्रोशीत आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम यावर प्रक्रिया उद्योग सुरू होण्याकरिता पतसंस्थेने मदत करण्याचे आवाहन केले. पतसंस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणारे अक्रम नाखवा, इंटेरियर डिझायनर प्रशांत माचकर, गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, करिम सावकार, हनिफ मुल्ला, रमण दळी, जयंत फडके, लाईक फोंडू, फकीर पांढरे, मजिद काझी, इम्रान हाजू, जुनेद फोंडू, नाना पावसकर, प्रशांत फडके, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे, रणजित सुर्वे, अमोल पाथरे, पावसचे उपसरपंच प्रवीण शिंदे, विजय देसाई, विक्रांत रांगणकर, मनोहर लेले, कांचनकुमार काळे, रघुनाथसिंह चुंडावत, मंगेश भोजने, अरविंद पवार, प्रकाश पवार, समीर हातोडकर, बाबाशेठ साळवी यांना सन्मानित केले. उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, पावस शाखा व्यवस्थापक विशाल सावंत व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे स्वागत केले.