जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त सीईओ गुरव यांचा स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे सत्कार

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर बँकेचे मुख्य कार्यकारी सुनील गुरव मंगळवारी निवृत्त झाले. त्यांना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे प्रेमळ निरोप देण्यात आला. त्यांचेसोबत नव्याने नियुक्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण हेदेखील उपस्थित होते.

या निरोप समारंभाचे वेळी त्यांनी वेळोवेळी संस्थेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचेहस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बँकेचे नव्याने नियुक्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी' श्री. चव्हाण यांनाही पतसंस्थेतर्फे शुभेच्छां देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट व उपव्यवस्थापक हेमंत रेडीज व. सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.